शबनम न्युज | पिंपरी
वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणारे पिंपळे सौदागरचे ज्येष्ठ नागरिक हभप रघुनाथ (आबा) खंडू काटे ( वय ८५ वर्षे) यांचे रविवारी (दि.२८) निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुले, सुना, नातू असा परिवार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथामागील वालुबाई दिंडीचे (क्रमांक १०) ते चालक व ज्येष्ठ मार्गदर्शक होत. सामाजिक कार्यकर्ते सुनील (आण्णा) काटे यांचे ते वडील होत.
Advertisement
Advertisement