शबनम न्युज | पिंपरी
यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. पुण्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. कार्यकर्त्यांबरोबर पुणेकरही उत्साहात विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुण्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील आमने-सामने आल्याचे पहायला मिळालं.
आदित्य ठाकरे पुण्यात असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेत आरती केली. दुसरीकडे चंद्रकांत पाटील देखील पुण्यात असून यावेळी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. दरम्यान पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार होती तेव्हा आदित्य ठाकरे तिथे पोहोचले. यावेळी चंद्रकांत पाटील तिथेच उपस्थित होते. आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत पालखीजवळ आले असता, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आधी दर्शन घेऊन येण्यास सांगितलं.
]