शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब मगर बँकेचे विद्यमान चेअरमन व वैदिक विस्डम एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राजेश सस्ते यांनी आज गणेशोत्सवानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशी डुडुळगाव गंधर्व नगरी येथील अनेक मंडळे सोसायटी श्रींची आरती सत्यनारायण महापूजा व भेटी देण्यात आल्या.
संत सावतामाळी मित्र मंडळ डुडुळगाव,अनुष्का सोसायटी मोशी,शामा फॉर्च्युन सोसायटी मोशी,ऑस्टिया सोसायटी डुडुळगाव,संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ गंधर्व नगरी,शिव राजवट मित्र मंडळ खान्देश नगर,व्हेंचर सिटी डुडुळगाव,विनायक सोसायटी मंडळ डुडुळगाव,केसर ट्री टॉऊन सोसायटी मोशी,सहकार मित्र मंडळ साई कॉलनी,साई हिरा सोसायटी मोशी,शिवतेज मित्र मंडळ शिवाजीवाडी तसेच मोशी डुडुळगाव गंधर्व नगरी येथील अनेक मंडळे सोसायटी श्रींची आरती सत्यनारायण महापूजा सहित भेटी देण्यात आल्या.