शबनम न्युज | पुणे
पुण्यातील नवले पुलाजवळ रविवार (दि.२०) रात्री ८ :३० च्या सुमारास मोठा अपघात घडला. या अपघातात ४७ वाहनांचे नुकसान झाले. तसेच अनेक जण जखमी ही झाले आहे. ट्रकचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक वाहनांना धडक बसली, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.
पुणे पोलिसांनी सांगितले की, वाहनावरील नियंत्रण सुटलेला ट्रक चालक फरार झाला असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहे. तसेच ११ जखमींवर १०८ रुग्णवाहिकेतून घटनास्थळी उपचार करण्यात आले, इतर ६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एक जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या भीषण अपघाताची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
Advertisement