शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित. शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव व आळंदी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिमेच्या आयोजन करण्यात आले होते.शरदचंद्र पवार महाविद्यालय व नगरपरिषद आळंदी यांच्या अंतर्गत कार्तिकी वारी २०२२ निमित्त आळंदी परिसरात इंद्रायणी घाट,महात्मा गांधी स्मारक, भक्त पुंडलिक मंदिर व सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देत स्वच्छतेचे फायदे कसे आहेत हे विविध उदाहरणाचे दाखले देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर मुरलीधर ढमाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या स्वच्छते मोहिमेत आळंदी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अंकुश जाधव मुकादम मालनताई पाटोळे जनहित फाउंडेशन चे कार्याध्यक्ष मा.श्री अर्जुन मेधनकर इंद्रायणी घाट व्यवस्थापक अभियंता मा.श्री वसंत शिंदे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा.संजीव कांबळे, प्रा. कैलास अस्तरकर डॉ.रणजित कदम,डॉ.राजू शिरसकर ,प्रा.विश्वनाथ व्यवहारे, प्रा.सविता मानके, प्रा.यशोदा खुळखुळे प्रा.प्रियंका जाधव आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील १६० स्वयंसेवक व आळंदी नगरपालिकेचे सफाई कामगार यांनी सहभाग नोंदवला.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.