शबनम न्युज | पुणे
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. ते ८७ वर्षाचे होते, गेल्या पंधरा दिवसाहून अधिक काळापासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. तसेच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती विक्रम गोखले यांच्या निधनानंतर रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन दिली.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून, आज सायंकाळी ६ वाजता वैकुंठ भूमी समशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
Advertisement