शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. स्वच्छ भारत अभियान पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबविण्यात येत आहे. याकरिता लोकसहभाग महत्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये स्थानिक नागरिकांमधुन आपले पिंपरी चिंचवड शहराचे नाव देशपातळीवर नेले आहेत अशा नागरिकांमधुन कलाकार, डॉक्टर, खेळाडु, शिक्षक, व विशेषत: अपंग व ट्रान्सजेन्डर यांचा ब्रॅन्ड एम्बेसिडर म्हणुन नियुक्ती देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत स्वच्छतेची लोकचळवळ व्यापक करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून क्रिडा क्षेत्रातील पुजा शेलार, ज्येष्ठ कलाकार सुरेश डोळस, तृतीयपंथीय शिवान्या पंकजा बोकील, अपंग संवर्गातुन संगिता जोशी- काळभोर व मुख्याध्यापक मनोज देवळेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे.
उपआयुक्त अजय चारठाणकर सो यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २ डिसेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ भारत अभियान समन्वयक विनोद जळक, सर्व ब्रॅन्ड ऍम्बेसिडर, केपीएमजी टीम उपस्थित होते. स्वच्छाग्रहाचे पेनस्टँड व बॅचेस देवुन स्वागत केले. यावेळी स्वच्छ सर्वेक्षणाची कार्यपध्दतीची माहिती चारठाणकर सो यांनी ब्रॅन्ड एम्बेसिडर यांना दिली. ब्रॅन्ड एम्बेसिडर यांची भुमिका स्पष्ट करत स्वच्छतेचे महत्व, कचरा विलगीकरण, घनकचरा व्यवस्थापन, स्टीचिंग युनिट, नवी दिशा, प्लास्टिक बंदी यांची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना समजुन देवुन स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छते विषयक मोहिमेमध्ये ऍम्बेसिडर यांनी वेळेचे नियोजन करुन जवळच्या ठिकाणी वेळोवेळी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच ब्रॅन्ड ऍम्बेसिडर यांचे मत, त्यांना येणा-या समस्या, त्यांच्या संकल्पना, नविन उपक्रम, त्यांची आयोजित कार्यक्रम यांचे महानगरपालिका स्वागत करेल.
पिंपरी चिंचवड हे देशातील सर्वोत्तम राहण्यायोग्य, स्वच्छ, सुंदर व हरित शहर करण्यासाठीच्या प्रयत्नांना ब्रॅन्ड ऍम्बेसिडर देत असलेल्या सहयोगाबद्दल आभार मानुन बैठक संपल्याचे जाहिर करण्यात आले.