पिंपरी : आम आदमी पार्टीच्या वतीने नागपूर येथे सुरू सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील आपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकरी, कष्टकरी, युवा, बेरोजगार, महागाई व सामान्य जनतेच्या मागण्यांसाठी महामोर्चा काढला. यामध्ये राज्यामधून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
शहरातील पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, राज चाकणे, यशवंत कांबळे, गोविंद माळी, राहुल नाईक तसेच रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई व सरकट पीकविमा अनिवार्य करा, शेत मजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम द्या,
उसाला योग्य एफआरपी द्या, कापसाला योग्य भाव द्यावा, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा. सरकारी शाळा दिल्लीच्या धर्तीवर दर्जेदार करा यांसह रिक्त जागा तत्काळ भरणे आदींसह अनेक मागण्यांसाठी आपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला, अशी माहिती बेंद्रे यांनी दिली.
नागूर येथे विधानभवनावर मोर्चामध्ये सहभागी शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते.