अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे. या चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे या चित्रपटावर वाद निर्माण झाला होता. उद्या पठाण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या अगोदर पठाण मधील दोन गाणे प्रदर्शित झाले आहेत. ‘बेशरम रंग’ आणि ‘झुमे तो पठाण’ हे गाणे देखील अत्यंत गाजले गेले. शाहरुख खानचे चाहते आतुरतेने पठाण चित्रपटाची वाट पाहत आहेत. आता शाहरुख खानने ट्विट करत ‘अब पठान की महफ़िल में आ जाओ’ असे ट्विट करत उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
पठाण चे दोन्ही गाणे सकाळी ११ वाजता प्रदर्शित करण्यात आली होती, विशेष म्हणजे पठाणचा टीझरही सकाळी ११ वाजता रिलीज झाला होता आणि आता पठाण चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीजची वेळही सकाळी ११ वाजता आहे. म्हणजे उद्या सकाळी ११ वाजता पठाण चित्रपटाचा ट्रेलर पाहू शकणार आहोत. शाहरुख खानने आज पठाणच्या रिलीजची तारीख आणि वेळ ट्विट करून लिहिले, “प्रतीक्षेसाठी आभारी आहे. अब पठान की महफ़िल में आ जाओ. पठाण चित्रपटाचा ट्रेलर उद्या सकाळी ११ वाजता रिलीज होणार आहे.”
Thank u for waiting….ab Pathaan ki mehfil mein aa jao….#PathaanTrailer out TOMORROW at 11 AM!
Hindi – https://t.co/sNPeRLR5p5
Telugu – https://t.co/istxh0xDhL
Tamil – https://t.co/rb9KKDB0Iw pic.twitter.com/fMAvtE9fh8Advertisement— Shah Rukh Khan (@iamsrk) January 9, 2023