शबनम न्यूज -पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवा नेते मनोज भाऊ जरे यांनी आपल्या प्रभागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच क्रीडा क्षेत्रात आपल्या प्रभागातील खेळाडूंना नावलौकिक मिळावे याकरिता भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले या क्रीडा स्पर्धेत विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.
शहीद भगतसिंग व्हॉलीबॉल स्पोर्ट फाउंडेशन व मनोजभाऊ जरे युवामंच यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संभाजीनगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल येथे करण्यात आला. ही स्पर्धा दिनांक ७ जानेवारी आणि ८ जानेवारी २०२२ या कालावधीत खेळवण्यात आली . या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
आपण यापुढेही अशा क्रीडा स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना चांगली संधी मिळून देण्याची कार्य करणार असल्याचे यावेळी युवा नेते मनोज भाऊ जरे यांनी सांगितले तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू तसेच उपस्थित असलेल्या नागरिकांचे व मान्यवरांचे मनोज भाऊ जरे यांनी आभार व्यक्त केले.