शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सन २०२३ दिनदर्शिकेचे (कॅलेंडर ) भोसरी विधानसभेचे आमदार आमदार महेशदादा लांडगे यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. ही दिनदर्शिका पाहिल्यानंतर आमदार महेशदादा लांडगे यांनी संघटनेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाचे कौतुक केले.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी अध्यक्ष सुरेशतात्या म्हेत्रे, उपाध्यक्ष – संजय जगताप, सचिव – जयंत कड, सहसचिव – प्रवीण लोंढे, खजिनदार – संजय ववले, संचालक – संजय सातव, नवनाथ वायाळ,हर्षल थोरवे, भारत नरवडे, अतुल इनामदार, स्विकृत संचालक – माणिक पडवळ, संजय भोसले, श्रीपती खुणे, रमेश होले, सल्लागार – बशीरभाई तरासगार हे उपस्थित होते. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना ही गेल्या अनेक वर्षापासून दिनदर्शिकेचे प्रकाशन करत आहे. या दिनदर्शिकेत सण-समारंभ, महत्वाच्या तिथी तसेच लघुउद्योजकांना टी.डी.एस.,जी.एस.टी.,प्रोफेशनल टेक्स इ. भरण्याच्या तारखांचा उल्लेख केलेला असून या दिनदर्शिकेचे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील संघटनेच्या सर्व सभासदांना वितरण केले जाते.