शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून कलाटे यांची समजूत काढण्यात आली असूनही, राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनतर आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी देखील कलाटे यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. मात्र, राहुल कलाटे यांनी निवडणूक लढविण्यास ठाम असल्याचे सांगितले
आहे.
आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील कलाटे यांच्या सोबत फोनवर चर्चा करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे मत कलाटे यांनी व्यक्त केले होते. यांनतर राहुल कलाटे यांनी आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे.
चिंचवड विधानसभा निवडणूक राहुल कलाटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक तिरंगी होणार आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज माघारीची वेळ दुपारी तीन पर्यंत होती. मात्र, शिवसेना उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे चिंचवडची लढत तिरंगी होणार आहे. त्यामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या वतीने नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी लढत होणार आहे.