हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर अकाउंट द्वारे दिली आहे. अभिनेता सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
80 च्या दशकात अभिनयाला सतीश कौशिक यांनी सुरुवात केली होती. ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटापासून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात त्यांनी कॅलेंडर ची भूमिका साकारली होती. या चित्रपटापासूनच त्यांना प्रसिद्धी मिळाली होती तर ‘रूप की रानी, चोरो का राजा’ या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.