शबनम न्यूज ( चऱ्होली )
प्रतिवर्षी प्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ३३४ वा बलिदान दिन अर्थात फाल्गुन अमावस्या निमित्त मंगळवार, दिनांक.२१ मार्च रोजी वेताळबुवा चौक, बैलगाडा घाटाजवळ, च-होली बुद्रुक येथे धर्मवीर मूकपद यात्रेचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, च-होली च्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या काळी न निघालेल्या अंत्य यात्रेचे स्मरण म्हणुन निघणार्या मूक पदयात्रेत सहभागी होऊन छत्रपती संभाजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी आणि माता भगिनींनी आपले आद्य धर्म कर्तव्य म्हणुन उपस्थित राहावे असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, च-होली च्या वतीने करण्यात आले आहे.
त्यानंतर ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता होईल अशी माहिती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.