रायगढ प्रतिनिधी
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले असल्या ची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार ते सुमारास जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती या भीषण अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बस मध्ये सहा मुली व 40 मुले असल्याची माहिती आहे बस मध्ये सहा मुली व 40 मुले होती सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त झांज पथक ऑर्डर मिळाल्याने पिंपरी चिंचवडला गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर तिथून रात्रीच्या सुमारास ते मुंबईला परत जात होते यावेळी हा भीषण अपघात घडला
#WATCH | Maharashtra: Rescue operation underway in Raigad's Khopoli area where 12 people died and over 25 others were injured after a bus fell into a ditch. pic.twitter.com/VHYGDBjyNp
— ANI (@ANI) April 15, 2023