शबनम न्युज | पिंपरी
महिलांसाठी निर्यात क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होण्याकरिता तसेच भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अभय भोर, अध्यक्ष इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने udyog trade expo & cultural summit 2023 संकल्पनेचे कार्यक्रम 24 एप्रिल रोजी ला इ स्क्वेअर – द फर्न, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
उपस्थित मान्यवरांना इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अभय भोर यांनी महिला उद्योजकांना महिला उद्योग संधी आणि योजनांबाबत माहिती दिली. तसेच महिलांनी बनवलेली उत्पादने सातसमुंदर पार जाणे महत्त्वाचे असून, त्याला विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी आखाती देशांमधील संधीचा फायदा घेण्यात यावा तसेच उद्योगांमध्ये आधुनिकीकरण आणून उद्योगाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी अभय पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आखाती देशांमध्ये उद्योगाबाबत एक्सपोर्ट ठेवण्यात येणार असून, त्याचा लाभ महिला उद्योजकांनी घेऊन आपली व्यवसाय वृत्ती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी अभिषेक, ममता गोणेल, श्रीमती देवयानी खरे, श्रीमती किरण जगताप, कार्यक्रमाचे संयोजक अक्षय अगस्ती, आयोजिका श्रीमती वैशाली उंब्रजकर यांनी महिला उद्योजका दुबई व अन्य आघाडी देशांमध्ये आपला व्यवसाय कसा वाढवू शकतात यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच या प्रसंगी उंब्रजकर व मंदार काणे यांच्यामार्फत “मणिकर्णिका पुरस्कार” या विशेषतः महिलांना दिला जाणारा पुरस्काराचे संकल्पनेचे अनावरण देखील करण्यात आले.