शबनम न्युज | पिंपरी
पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रभाग क्रमांक 24 मधील नालेसफाईच्या कामास सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरस यांनी क्षेत्रीय प्रभाग अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा व प्रभाग चिंचवड यांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, बापदेव नगर पासून ते मुकाई देवी मंदिर त्याचप्रमाणे दांगट वस्ती च्या मागील बाजूने गेलेला नाला ते हायवे रोड ओम पॅराडाईज सोसायटी पर्यंतचा नाला त्याचप्रमाणे किवळे गाव मधील असलेले नाले हे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेतर्फे स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात यावी, कारण काही दिवसांवरती पावसाळा येऊन ठेपलेला असून आजतागायत नाल्यात खूप मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे वाढलेली असून, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डासांचा फैलाव होत आहे त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईच्या कामास सुरुवात करावी, असेही सदर निवेदनात तरस यांनी नमूद केले आहे.