पुण्यात दि. २१ ते २३ मे रोजी राजपथ महाराष्ट्र वरिष्ठ गट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा होत आहे ७१ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा पुण्यात महाळूंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकूल येथे दि. २१ ते २३ मे २०२३ या काळात संपन्न होत आहेत. महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोशिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेला राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. यांनी पुरस्कृत केले आहे. महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोशिएशनला संलग्न असणार्याल ३३ जिल्हा अॅथलेटिक्स संघटनांचे एकूण ७१५ खेळाडू यात सहभागी होत आहेत. फक्त गडचिरोली जिल्हा अॅथलेटिक्स असोशिएशन काही अपरीहार्य कारणामुळे यात सहभागी होऊ शकले नाही. या स्पर्धेत पुणे जिल्हा अॅथलेटिक्स असोशिएशनचे सर्वाधिक ७९ खेळाडू सहभागी होत असून, सातारा ५० आणि सांगली ४५ हे प्रमुख संघ आहेत.
ओरीसाची राजधानी भुवनेश्वर येथे दि. १५ ते १८ जून २०२३ या दरम्यान संपन्न होणार्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ गट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा होत आहेत. पुण्यात होणार्याा महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रावीण्य मिळवणार्याध खेळाडूंची महाराष्ट्र टीममध्ये निवड होईल आणि ही महाराष्ट्र टीम भुवनेश्वर येथील स्पर्धेत सहभागी होतील.
माजी आंतरराष्ट्रीय अॅथलेट होमियार मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली अन्य ४ माजी आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स यांची निवड समिती महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोशिएशनने तयार केली असून त्यांनी घालून दिलेल्या गुणवत्ता निकषानुसार खेळाडूंना महाराष्ट्रच्या टीममध्ये सहभागी केले जाईल.
तेजस शिरसे, ताई बाम्हणे, शर्वरी परुळेकर, ऐश्वर्या मिश्रा, पूर्वा सावंत, अनुष्का कुंभार, सुधेष्णा शिवणकर, अवंतिका नरळे, निधी सिंग, शिवेच्छा पाटील, रोहन कांबळे, सर्वेश खुशारे, किसन तडवी, दिनेश, साक्षी सरगर, दुर्गा देवरे, जय शहा, आरती पाटील असे आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धा गाजवणारे अनेक खेळाडू पुण्यातील या स्पर्धेत सहभागी होत आहेत. याशिवाय नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पदके मिळवलेले अनेक नामांकित खेळाडूदेखील या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
या स्पर्धेवेळी असोसिएशनचे अध्यक्ष, ऑलिम्पियन, अर्जुन पुरस्काराचे मानकरी डॉ. अदिल सुमारीवाला यांच्यासह राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम उपस्थित राहणार आहेत.