शबनम न्यूज | मुंबई
सध्या इंस्टाग्राम बनवण्यात अनेक तरुण-तरुणी भन्नाट आयडिया वापरतात. या रिल्स मधून लोकांची क्रिएटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. अनेक क्रिएटिव्हिटी वेगवेगळ्या प्रकारे तरुण-तरुणी इंस्टाग्राम वर बनवून शेअर करतात. सध्या इंस्टाग्राम ला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे अनेक तरुण तरुणी वेगवेगळ्या प्रकारे आयडिया वापरून रिल्स बनवतात. मात्र, रिल्स बनवण्याच्या नादात भलत्याच गोष्टी होताना ही दिसतात. असाच एक प्रकार मुंबई जवळच्या वसईच्या किल्ल्यावर पाहायला मिळाला. वसई किल्ल्यावर आलेल्या एका हौशी पर्यटकांनी इंस्टाग्राम रील बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील एका चर्चमध्ये आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे वसई किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप दुर्गप्रेमी करत आहेत. काही दुर्गप्रेमींनी याप्रकरणी पुरतत्व विभागाकडे तक्रार केली असून या तरुणावर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.