शबनम न्युज | पिंपरी
जावयाला घरातून दुसरीकडे राहायला जाण्यास सांगितल्याने जावयाने सासूच्या तोंडावर गरम पाणी फेकले, तसेच केस धरून जमिनीवर डोके आपटल्याने त्यांचे दोन दात पडले. या प्रकरणी खडकी पोलिसांनी महेंद्र सिद्धनाथ तोरणे (वय 25, रा. आर्मी क्वार्टर, सर्वत्र विहार कॉलनी, मुळा रोड) याला अटक केली आहे. सासु वर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घर जावया बरोबर झालेल्या वादात सासूने घरात राहू नको असे म्हटल्याने जावई चिडला. आरोपी महेंद्र हा त्यांचा जावई असून त्यांची मुलगी आणि त्या असे तिघे आर्मी क्वार्टर सर्वत्र विहार, मुळा रोड समोर राहतात. सोमवारी सकाळी जावई आणि सासू यांच्यात वाद झाला, त्यावेळी त्यांनी जावयाला घरातून दुसरीकडे राहायला जाण्यास सांगितल्याने त्याने पाणी तोंडावर टाकल्याने सासूच्या चेहऱ्याला भाजले आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत अधिक तपास खडकी पोलीस करीत आहे.