शबनम न्युज | पुणे
सीबीएससी बोर्ड म्हणजे केंद्रीय विद्यालयाचा दहावी आणि बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला होता. त्यानंतर आता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर केली आहे.उद्या म्हणजेच गुरुवार दि. 25 मे रोजी दुपारी तीन वाजता बारावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर 2 वाजता निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जाऊन HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
Advertisement