शबनम न्युज | नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
ओडिशा येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पश्चिम बंगाल सरकारने मदत जाहीर केली आहे .मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
ओडिशाच्या बालसोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोमंडळ एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली असल्याने हा अपघात घडला आहे.
Advertisement
पश्चिम बंगाल सरकारने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि राज्यातील पिढीतांना प्रत्येकी 50,000 रुपये देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.