शबनम न्युज | पुणे
पुणे शहरात मंगळवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठले. मान्सून सक्रिय असल्याने पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून, येत्या 24 तासांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून, येत्या चार-पाच दिवसांमध्ये हीच स्थिती राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. तसेच आकाशात मोठ्या आकाराचे ढग निर्माण झाले असून तशी अवस्था येत्या 30 जून पर्यंत राहणार आहे.
शहरात दुपारी आकाश पूर्णतः ढगाळ राहणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान घाट माथ्यावर अतिवृष्टी होणार आहे. हवामान खात्याने कोकण, नाशिक, मध्य महाराष्ट्र अलर्ट जारी केला आहे. पुणे व घाटमाथ्यावर येत्या 30 जून पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर तो कमी होईल पुण्यात 30 जून पर्यंत निरर्भ्र आकाश पाहायला मिळणार नाही, मध्यम स्वरूपाचा पाऊस सतत होणार आहे.