शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष नेटा डिसूजा व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे व डॉ कैलास कदम अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाने सौ.सायली किरण नढे अध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर मध्ये झालेल्या अमानवी महिला अत्याचारांच्या व भाजप दलाल किरीट सोमय्या सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या नग्न व्हिडिओ व भाजप सरकारच्या विकृती विरोधात किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
भारतात महिलांवर अत्याचार वाढत आहेत काँग्रेसच्या काळात महीला सुरक्षित होत्या मात्र भाजपा सरकार आल्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत त्याच बरोबर तेल वाढ गॅस वाढ अनेक घरगुती वस्तूचे भाव वाढले आहेत भाजपा महागाई कमी करण्यात असफल झाले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला काँग्रेसला निवडून देऊन भाजपला हद्दपार करावे. त्याच बरोबर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडओ व्हायरल झाला त्यानंतर त्याची चौकशी होयला पाहिजे होती मात्र ते भाजपा चे पदाधिकारी असल्याने कुठलेही चौकशी झाली कुठलेही कारवाई झाली नाही . भाजप एकीकडे बेटी पढाव बेटी बचाव चा नारा देत आहे आणि दुसरीकडे भाजपाचे नेते जे आहेत महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल करत आहेत अशा नेत्यावरती कारवाई होणार का महाराष्ट्राचे गृहमंत्री या असलेली व्हिडिओची चौकशी करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
किरीट सोमय्या यांच्याजागी इतर पक्षाचे कोणी नेते असते तर आता पर्यंत जेल मध्ये असते किरीट सोमय्या हे भाजपचे नेते असल्यामुळे त्यांच्यावर आता पर्यंत कारवाई झाली नाही त्यामुळे आज आम्ही किरीट सोमय्या यांचा जोडे मारून निषेध करतो असे यावेळी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षा सौ. सायली किरण नढे यावेळी म्हणाल्या
या आंदोलनाला मा. नगरसेविका निगार बारस्कर, श्यामला सोनवणे मा प्रदेशाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी स्वाती शिंदे, आशा भोसले, सोनू दमवानी, निर्मला खैरे, रंजना सौदेकर, अर्चना रसाळ, मयुरी कांबळे, अभिमन्यू दहीतुले, हरीश डोळस, भाऊसाहेब मुकुटमल आदी जण उपस्थित होते.