शबनम न्युज / पिंपरी
१० जून हा दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधत आज दि १० जून २०२१ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२ व्या वर्धापनदिनी पिंपळे सौदागर येथे माजी विरोधी पक्ष नेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धना विषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा झाडे लावण्यामागचा हेतू आहे.
माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते प्रभाग 28 पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ते म्हणाले, “कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगात ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले.आपणा सर्वांना माहीत आहे ऑक्सिजन झाडापासून मिळतो त्यामुळे सर्वांनी झाडे लावून त्याचे जतन केले तर मानवाचे भविष्य अबाधित राहील. तसेच शहरामध्ये वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर उपाय पाहिजे असेल तर पर्यावरणाचे रक्षण आपणा सर्वांना करावे लागेल.म्हणून येत्या काही दिवसात सुरु असलेल्या विकास कामासोबत पिंपळे सौदागर परिसरात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प असल्याचा निर्धार नाना काटे यांनी कला. ” यावेळी कुलदीप देशमुख, विक्रम मोहिते, प्रशांत देवकाते, संग्राम चव्हाण, विशाल माझिरे, अविनाश गायकवाड आदी उपस्थित होते.