शबनम न्युज | पुणे
समृद्धी महामार्गावर दुसरी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना क्रेन पडली आहे. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान. याघटनेनंतर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि, “महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनं दु:ख झालं आहे. मृतांच्या कुटुंबाबरोबर माझ्या सहवेदना आहेत. तर, जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. एनडीआरफ आणि स्थानिक प्रशासनाकडून अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.”
“मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर, जखमींना ५० हजार रुपये देण्यात येतील”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.