- रहाटणी प्रभाग क्रमांक २७मधील MNGLच्या (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) कामाचे रविवारी (दि. ३० जुलै) भाजपचे नूतन शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच फाउंडेशनचे अध्यक्ष देविदास आप्पा तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाचा शुभारंभ झला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्गांचे लोकार्पण करण्यात आले आहे. तसेच यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड भागाला 15 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची लोकार्पण तसेच भूमिपूजन करण्यात आले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी खास या पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले असले तरी त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतले. तिथे अभिषेकही केला. त्यांनतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी समस्त पुणेकरांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी पुणे आणि काशी यांच्यातील एक साम्यही आपल्या भाषणात स्पष्ट केले.
- पत्रकारांवर कुणाचा दबाव असता कामा नये हे टिळकांचे धोरण होतं – पवार
- शांत पुण्याचे महत्व मोठ्या प्रमाणात आहे. पुणे जिल्ह्यातच शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची स्थापना इथूनच केली. – शरद पवार
- देशातला पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवाजी महाराजांनी केला – शरद पवार
- जागतिक नेते म्हणून नावलौकिक मिळवलेले पंतप्रधान मोदी यांची निवड केल्याबद्दल टिळक स्मारक ट्रस्टचे मी आभार व्यक्त करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळाली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक देशांनी सन्मानित केले. मोदींनी जागतिक स्तरातुन आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानी आणली आहे. जगभरातील महत्त्वाचे नेते पंतप्रधान मोदींकडे विश्वासाने पाहतात, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवक यांच्या जीवनात बदल घडवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. तसेच या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे भाग्य आहे.
- (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य)
- समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने…
Advertisement— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2023
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा
#LIVE | #पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान सोहळाhttps://t.co/xhiUL3Y6ac
Advertisement— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 1, 2023
- पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती !
मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या समवेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन | पुणे https://t.co/Dh6tYHEAKO
Advertisement— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2023
- राज्याच्या विरोधी पक्ष पदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार !
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदी कॉंग्रेसचे नेते विजय वड्डेट्टीवार यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन, मी २०१८-१९ मध्ये युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्ष असतांनाही वड्डेट्टीवार साहेब विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळेस ते संघटनेला कायम मदत करायचे.
अपेक्षा आहे की, ते जबाबदार…
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 1, 2023
Advertisement
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात अभिषेक सुरू झाला आहे. थोड्याच वेळात मोदी करणार महाआरती.
#WATCH | Maharashtra: Prime Minister Narendra Modi offers prayers at Shreemant Dagdusheth Halwai Mandir in Pune. pic.twitter.com/HKGXBWb8nd
— ANI (@ANI) August 1, 2023
Advertisement
- पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना आज सन्मानित करण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने अवघ्या राज्याचं लक्ष आज पुण्याकडे लागलेलं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले असून, दगडूशेठ गणपतीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
PM @narendramodi reached Pune a short while ago, where he was welcomed by various dignitaries. He will be taking part in different programmes in the city. pic.twitter.com/YnEttLVJ2a
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
Advertisement
- पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडून पंतप्रधान मोदींचे स्वागत
स्वागतम्!
ऐतिहासिक शहरासाठी ऐतिहासिक दिवस!
पुणे शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण तथा भूमिपूजन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते आज संपन्न होणार आहे. तसेच, थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने मा. मोदीजींना… pic.twitter.com/JfOZWegt8a— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 1, 2023
Advertisement
- समृद्धी महामार्गावरील क्रेन दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर !
समृद्धी महामार्गावर दुसरी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना क्रेन पडली आहे. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान. याघटनेनंतर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे.
Pained by the tragic mishap in Shahapur, Maharashtra. My deepest condolences to the families of those who lost their lives. Our thoughts and prayers are with those who are injured. NDRF and local administration are working at the site of the mishap and all possible measures are…
— PMO India (@PMOIndia) August 1, 2023
- समृद्धी महामार्ग अपघातातील मृतांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून श्रद्धांजली !
शहापूर येथे समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना क्रेन कोसळून १६ कामगारांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. ही घटना दुर्दैवी असून अशा घटना टाळण्यासाठी काटेकोर खबरदारी घेतली पाहिजे.
मृतात्म्यांस भावपूर्ण श्रध्दांजली आणि जखमींना लवकरात लवकर बरं करण्यासाठी…
Advertisement— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 1, 2023