शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
विद्यार्थीनी स्टार्टअप उद्योजकता करियर घडविण्यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे अध्यक्ष अभय भोर यांच्या पुढाकाराने आज डी वाय पाटील कॉलेज पिंपरी येथील बीबीए वर्गाच्या विद्यार्थिनींची ऑटो क्लस्टर येथे औद्योगिक सहल घेण्यात आली.
पुढील काळात एमआयडीसी बाबतीत प्रत्येक कंपनीमध्ये विद्यार्थ्याला उद्योगाची ओळख करून दिली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या समूहामध्ये उत्पादन निर्मिती करून ते विक्री करण्याची जबाबदारी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची असेल देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे. उद्योजकता आणि नाविन्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या उद्देशाने आज विद्यार्थ्यांची औद्योगिक सफर करण्यात आली. या सहलीत येणाऱ्या आधुनिक मशिनरी स्टार्टअप विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी थ्रीडी प्रिंटिंग लेझर कटिंग व्हीएमसी हार्डर्निंग टेस्टिंग व अनेक प्रकारच्या मशनरी दाखविण्यात आल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो परंतु शिक्षण घेता घेताच जर त्यांना उद्योगाची ओळख करून देण्यात आली तर निश्चित ते आपले ध्येय आणि धोरण ठरवणे मध्ये यशस्वी ठरतील त्यामुळे युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम अभय भोर करत आहे.
नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावले उचलून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे शिक्षण घेणारा तरुण-तरुणी हा कौशल्य युक्त असावा यासाठी शासनही विविध योजना राबवत आहे आरोग्य हॉटेल औद्योगिक क्षेत्र आयटी क्षेत्र यामध्ये उच्चतंत्रज्ञान आत्मसात केलेल्या कुशल मनुष्यबळाचे अत्यंत आवश्यकता असल्याचे लक्षात येऊन तरुण वर्गाला उद्योगाची जवळ आणण्यासाठी आज युवा विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेण्यात आली उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी यासाठी निश्चित मदत होईल फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर अनुभव आणि स्टार्टअप उद्योग उभे करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
आज औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहे बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी तांत्रिक प्रशिक्षण गरजेचे असल्याचे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी मत मांडले. पुढील काळात पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक युवा विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारे औद्योगिक परिसरात सहली निर्माण करून महाराष्ट्रातील स्टार्टअप वाढविण्यासाठी मदत आणि प्रयत्न केले जाणार असल्याचे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
यावेळी अभय भोर , डॉ. डी वाय पाटील कॉलेजचे प्राचार्य रणजीत पाटील सर, आटो क्लस्टर चे व्यवस्थापक गोरे सर तसेच कॉलेजचे बी.सी.ए विभागाचे प्रमुख प्राचार्य ओमकार शेळके, वैशाली देशमुख, डॉ.रणजीत कदम आदी उपस्थित होते.