शबनम न्युज | पिंपरी (वृत्तसंस्था)
पिंपरी गोळीबार प्रकरणात मोक्कातील टोळीप्रमुखांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी 25 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली आहे. टोळीप्रमुख विकी सुतार असे जामीन अर्ज मंजूर झालेल्याचे नाव आहे.
2010 मध्ये झालेल्या राकेश घुलेच्या खुणाचा बदला घेण्यासाठी तसेच 2017 च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत आरोपी सचिन नढे व विजय नढे यांच्याशी झालेल्या वादातून टोळीप्रमुख विकी सुतार व त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यासाठी टोळीप्रमुख विकी सुतार याला इतर आरोपींनी पिस्तूल पुरविले होते. संपूर्ण घटनेच्या पद्धतीशी कट रचला होता. संतोष कुरवत हा पिंपरी येथील एका हॉटेलमध्ये येणार आहे, अशी माहिती मिळाल्यावर आरोपी हॉटेलच्या आजूबाजूला डबा धरून बसले होते. संतोष कुरवत हॉटेलमध्ये आल्यावर आरोपींनी गोळीबार सुरू केला होता. याप्रकरणी अटक आरोपींन जामीन वर सुटका करण्यात आली.