शबनम न्युज | पिंपरी (वृत्तसंस्था)
‘आम्ही या एरियाचे भाई आहोत,’ असे म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. गांधीनगर पिंपरी येथील रविवार (दि. 15 ) रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. तुषार राजू बनपट्टे (वय 22 रा.खरारवाडी पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार वैभव हत्तगळे (वय 25 )आणि त्याच्या इतर साथीदाराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार आणि त्यांचा मित्र करण विठ्ठल बनपट्टे हे गांधीनगर येथील एका टपरी समोर आइस्क्रीम खात थांबले होते. त्यावेळी तिथे हातातील कोयते फिरवत आरोपी आले. ‘आम्ही या एरियाचे भाई आहोत’, असे म्हणून त्यांनी विनाकारण फिर्यादी तुषार यांच्या डोक्यात कोयत्याने मारून गंभीर जखमी केले.
Advertisement