शबनम न्युज | पिंपरी (वृत्तसंस्था)
पिंपरी मध्ये दुकानातून साहित्य चोरून नेताना चोरट्याला रंगेहाथ पकडले. त्यावेळी चोरट्याने झटापट करून दुकान मालकासह तिघांना मारहाण केली. हरगुडे वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे 4 ऑक्टोबर रोजी रात्री 9 ते 5 ऑक्टोबर सकाळी 9 या कालावधीत व रविवार (दि. 15 ) रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.
अजिजू रहिमान उबैदुल्ला खान (वय 36 रा. कुदळवाडी, चिखली), धनीराम वर्मा, मग्रुरम वर्मा अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अजिझु खान यांनी रविवार (दि. 15 ) चिखली पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली. त्यानुसार सनी विनोद गौड (वय 19, रा.बालाजी नगर ,झोपडपट्टी एमआयडीसी भोसरी) संजय राणावत आणि विशाल या संशयिकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सनी गौड यानेत्याच्या दोन साथीदारांसह मिळून फिर्याद खान यांच्या दुकानातून दीड लाख रुपये किमतीचे कारबायड इन्सर्ट नावाचे 200 किलो भंगार चोरून नेले.