शबनम न्युज | नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
देशातील सर्वोच्च न्यायालयाने आज समलैंगिक विवाहबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नसून, समलैंगिक जोडप्याने मुले दत्तक घेण्याची देखील परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विशेष विवाह कायद्यात बदल करण्यास देखील नकार दिला.
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने समलैंगिकांना मुले दत्तक घेण्यास परवानगी देण्यास विरोध केला होता, असा प्रयोग करू नये, असे आयोगाने न्यायालयात सांगितले होते. संशोधनाच्या आधारे असा युक्तिवाद करण्यात आला की, समलैंगिक व्यक्तीने वाढवलेल्या मुलाचा मानसिक आणि भावनिक विकास कमी होऊ शकतो. त्यानंतर सुरुवातीला जेव्हा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपला निर्णय वाचण्यात सुरुवात केली, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष होते. पण अखेर न्यायालयाने आयोगाच्या संशोधनाला दुजोरा देत समलैंगिक जोडप्यांना मुले दत्तक देण्यास नकार दिला.