पुण्यातील शिरूर लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी निश्चितच दावा करणार दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार हवा तरच ते या मतदारसंघावर दावा करू शकतात.
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी । प्रतिनिधी :पुण्यातील शिरूर लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी निश्चितच दावा करणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यात केले, प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो तसेच आम्हीपण शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा करणार आहोत त्यांच्या या वक्तव्याने महायुतीत भाजप व शिंदे गट शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
भारतीय जनता पार्टी वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार महेश लांडगे तयारी करत आहेत तर शिंदे गटाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही शिरूर लोकसभा मतदार संघासाठी तयारी करत असल्याने आता दिलीप वळसे पाटील यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत बिघाडी होते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या शिरूर लोकसभा मतदार संघ हा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत,
शिरूर लोकसभा मतदार संघ हा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे असला तरी अजित पवार गटाची राष्ट्रवादी या मतदारसंघावर दावा करणार असल्याने राजकीय मोठा पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. भाजप वतीने आमदार महेश लांडगे लोकसभेसाठी जरी इच्छुक असले तरी शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही पूर्णपणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने जर शिरुर लोकसभा मतदारसंघावर दावा केला तर महायुतीत बिघाडी होईल.हे नक्की.
मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आमदार महेश लांडगे हे शिरूर लोकसभा मतदारसंघ लढविण्यासाठी तीव्र इच्छुक होते परंतु पक्षाच्या आदेशाच्या मुळे त्यांनी माघार घेतली , परंतु यावेळी आमदार महेश लांडगे हे भाजपच्या चिन्हावर लोकसभा लढविणार असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत तसे पाहता महेश लांडगे हे शिरूर लोकसभा मतदारसंघ करिता तयारीला लागले आहेत तर शिंदे गटाचे आढळराव पाटीलही यावेळी तीव्र इच्छुक आहेत अशातच अजित पवार गटाने जर दावा केला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार हवा तरच ते या मतदारसंघावर दावा करू शकतात.अन्यथा अजित पवारांना शिरूर लोकसभेचा दावा मागे घ्यावा लागेल .
अजित पवार पवार गटाच्या राष्ट्रवादी वतीने माजी आमदार विलास लांडे हे लोकसभा मतदारसंघात प्रयत्न करू शकतात, मागील वेळी माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेकरिता तयारी केली होती, परंतु ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्याने आमदार विलास लांडे यांना माघार घ्यावी लागली होती, सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असल्याने ते परत एकदा या मतदारसंघात निवडणूक लढविणार यात शंका नाही , परंतु जागा वाटपामध्ये महायुतीत कोणतीही बिघाडी होऊ नये याची दक्षता तिन्ही पक्षाचे नेते घेतीलच. आगामी येणारा काळच ठरवेल की शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोणत्या पक्षाचा असेल.