शबनम न्यूज , प्रतिनिधी :
सांगवी: पिंपरी चिंचवड परिसरातील समाजकार्यात अग्रगण्य असणाऱ्या सातारा मित्र मंडळ सांगवी नवी सांगवी पिंपळे गुरव मंडळाचा दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपळे गुरव येथील अनाहत योगा हॉल मध्ये हा कार्यक्रम आयोजीत केला होता.मंडळाचे खजिनदार महेश भागवत यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज व सरस्वती चे पूजन करण्यात आले. व मंडळाच्या दप्तराचे ही पूजन करण्यात आले . सर्व सातारकर बंधू भगिनी नी दसऱ्या निमीत्त आयोजीत सीमोल्लंघन कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी मंडळाने वर्षभरात राबविलेल्या उपक्रमाची माहिती सांगितली.
यावेळी बोलताना श्री माने म्हणाले की रायगड जिल्हयातील ईरशाळवाडी या गावाला जीवनोपयोगी साहित्याची व अर्थिक मदत केली. चिपळूण मधिल लोठे परशुराम येथील गो शाळेला गाईंच्या चाऱ्यासाठी एक लाख रुपयाची केली. तसेच इ. १० वी व इ.१२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा चिंचवड विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार श्रीम. अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भविष्यातील विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी सभासदांना सांगितली. यावेळी प्रत्येक सातारकर एकमेकांना अतिशय आनंदाने सोन देऊन आलिंगन देत होता. एकमेकांची विचारपूस करत होता. एकजुटीने काम करू असच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होत व आनंद ओसंडून वहात होता.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, सचिव सोमनाथ कोरे, सह खजिनदार अभिजित जगताप, सदस्य अमित देशमाने, विश्वास शिंदे, जावेद फरास, लक्ष्मण शिंदे, गोरक्षनाथ पाटील, प्रकाश घोरपडे, आधिकरव साळवे,आकाश शिंदे, व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी केले व आभार सचिव सोमनाथ कोर यांनी मानले.