शबनम न्युज | पिंपरी
मनोज जरांगे पाटील यांच्या या आमरण उपोषणास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मुस्लीम समाज तसेच रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) च्या अल्पसंख्यांक आघाडी तर्फे पाठिंबा देण्यात आला आहे.
रिपाई ( आ )चे नेते अल्पसंख्याक आघाडी चे प्रदेश सरचिटणिस मा खाजाभाई शेख, व रिपाई ( आ ) चे अल्पसंख्याक आघाडी चे शहर सरचिटणिस मा फय्याज सनदी, तसेच मा आझम शेख, कु अश्वीनी सहारे, मा अप्पालाल नदाफ , मा शाकीर तांबोळी, मौलाना जावेद सलगर, मा मेहबुब खाटीक, मा हनीफ भाई शेख यांनी उपोषणाला पाठिंबाचे पत्र मोशी येथील उपोषण कर्त्याना सुर्पद केले. तरी शासनाने या विनंतीवजा पत्राच्या माध्यमातुन लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Advertisement