माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन
संभाजी बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न
पिंपरी चिंचवड – प्रतिनिधी, –
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मागील आठ वर्षापासून कार्यरत असलेल्या शबनम न्यूज मीडिया ग्रुप वृत्तसंस्थेच्या वतीने यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर शानदार या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते ,माजी नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या शुभहस्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रथमतः नाना काटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सत्कार समारंभ संपन्न झाले त्यानंतर शानदार दिवाळी विशेषांक 2023 चे प्रकाशन विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य संभाजी बारणे होते.
या कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका मनिषा पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार, राष्ट्रवादीचे युवा नेते शेखर काटे, प्रशांत सपकाळ, ववले महाराज, माजी नगरसेविका उषा गजभार, नारी शक्ती संघटनेच्या संचालिक पूजा सराफ, साहूल हमीद शेख या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढविली.
आपली प्रस्तावना मांडताना शबनम सय्यद यांनी वृत्तसंस्था मागील आठ वर्षांपासून अविरतपणे पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असून विविध स्तरातील वृत्त वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत असल्याचे सांगितले, तसेच यावर्षी दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने शानदार या दिवाळी विशेषांकात वाचकांसाठी दिवाळीच्या आनंदात भर घालणारे वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले तसेच या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन माजी विरोधी पक्षनेते, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते होत असल्याने आनंद व्यक्त केला.
वृत्तसेवा कार्य तत्परतेमुळे शबनम न्यूज वृत्तसंस्था घराघरात पोहोचली – नाना काटे
या दिवाळी सणाच्या निमित्ताने शबनम न्यूज वृत्त संस्थेने शानदार हे दिवाळी विशेषांक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले या निमित्ताने मी या वृत्तसंस्थेच्या संपादिका शबनम सय्यद यांना शुभेच्छा देतो. त्यांचे हे वृत्त संस्थेचे कार्य असेच सातत्याने चालत राहो अशा शब्दात नाना काटे यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.
एक उत्कृष्ट साहित्य शानदार दिवाळी विशेष अंकाच्या रूपाने उपलब्ध झाल्याचे समाधान – संभाजी बारणे
शबनम न्यूज वृत्तपत्राने आपल्या प्रामाणिक कामगिरीने मिळविला नावलौकिक – शेखर काटे
माजी नगरसेविका मनिषा प्रमोद पवार यांनीही याप्रसंगी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व दिवाळी विशेष अंकाचे कौतुक केले.
तसेच राष्ट्रवादीचे थेरगाव परिसरातील युवा नेते प्रशांत सपकाळ यांनी हि शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रम प्रसंगी, पत्रकार कलिंदर शेख ,मुजफर इनामदार , अशोक सातपुते, किरण साळवे ,लहू वाघमारे, मंजू गुप्ता, रजनी गोसावी ,शितल दुर्वे ,गुलनार सय्यद, निर्मला माने, संगीता कोकणे, ज्योती डोळस आदी मान्यवरांसहित थेरगाव परिसरातील नागरिक महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदास डोके यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवर व उपस्थित नागरिकांचे आभार व्यक्त केले.