शबनम न्युज | बारामती
राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज गोविंदबागेत दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले असताना बारामतीत असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार तिकडे गेले नाहीत. यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने ते दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहू शकले नाही.
मात्र अजित पवार हे बारामतीतच असूनही तिकडे फिरकले नाहीत. अजित पवार यांनी काटेवाडीत धनी वस्तीला भेट दिली. देविदास काटे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या घरी अजित पवारांनी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले.
अजित दादांना डेंग्यू झाल्याने ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. अर्धा ग्लास हा नेहमी अर्धाच असतो तो रिकामा नसतो, देवाने मला आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्या आणि यातून मी फार काही शिकले आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.