शबनम न्युज | मुंबई
“जेव्हाही मी स्वतःला चित्रपटात पाहते तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटते. मी माझा कोणताही चित्रपट पाहिलेला नाही,” असा मोठा खुलासा अभिनेत्री करीना कपूर हिने केला आहे. करण जोहरचा रिऍलिटी शो ‘कॉफी विथ करण’ यामध्ये तिने हा खुलासा केला आहे. करण जोहरचा ‘कॉफी विथ करण सीझन ८’ शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. आत्तापर्यंत या सीझनचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत.
दरम्यान या भागामध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट हिने हजेरी लावली होती. यामध्ये करीना आणि आलियाने अनेक गुपिते उलगडली आहेत. तसेच करीनाने स्वत:च्या चित्रपटांबाबतही मोठा खुलासा केला आहे. करीना कधीही स्वत:चे चित्रपट बघत नाही. कॉफी विथ करण शोमध्ये करीनाने यामागचे कारणही सांगितले आहे.
यावेळी बोलताना करीना म्हणाली, “जेव्हाही मी स्वतःला चित्रपटात पाहते तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटते. मी माझा कोणताही चित्रपट पाहिलेला नाही. सध्या मी अशा ठिकाणी आहे जिथे मी खूप आनंदी शांत आणि तणावमुक्त आहे. सगळं चांगले चालल आहे. अशा परिस्थितीत, जर मी स्वतःकडे बघितलं तर मी स्वतःलाच जज करायला लागेन अस मला वाटते.”