शबनम न्युज | पुणे
देशात सर्वप्रथम ‘जेएन. १’ या ओमिक्राॅनच्या (काेराेना) व्हेरियंटचा रुग्ण केरळमध्ये सापडल्यानंतर आता महाराष्ट्रातही एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमध्ये ४१ वर्षांच्या पुरुषालाही या व्हेरिएंटची लागण झाली आहे. या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आदेश राज्याच्या आराेग्य विभागाने दिले आहेत. तसेच याची साैम्य लक्षणे असून, ताे बरा हाेताे, असेही आराेग्य विभागाने म्हटले आहे.
राज्यामध्ये नियमितपणे काेराेनाबाधितांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनाेम सिक्वेन्सिंग) करण्यात येत आहे. सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.
Advertisement