शबनम न्युज | मुंबई
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आज अखेर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हजारोंच्या समर्थकांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते.
आज संजोग वाघेरे आपल्या हजारो समर्थकांसह मातोश्रीवर दाखल झाले. आज सकाळपासूनच संजोग वाघेरे हे 500 गाड्या घेऊन मुंबईकडे रवाना झाले होते. त्यांच्यासह अनेक शिवसैनिक, त्यांचे सहकारी मित्र मंडळ व हजारो संख्येने समर्थक मुंबईला रवाना झाले होते. दुपारी बारा वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजोग वाघेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सचिन अहिरे, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले, माजी नगरसेवक एकनाथ पवार, युवक शहराध्यक्ष चेतन पवार, माजी आमदार गौतम चाबुकस्वार असे अनेक नेते उपस्थित होते.