शबनम न्यूज , प्रतिनिधी : आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुल डुडुळगाव, (आळंदी) जि.पुणे. या ठिकाणी शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, रामचंद्र पाटील औटी ज्युनिअर कॉलेज, राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय व आदित्य इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षि शिवनेर भूषण स्व. विलासराव तांबे यांच्या 13 व्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. सुरेंद्र पवार यांनी शिक्षणमहर्षि स्व. विलासराव तांबे यांनी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था स्थापन करून शिक्षणाची ज्ञानगंगा डोंगर कपारी मध्ये राहणाऱ्या गरीब आदिवासी मुला मुलींच्या शिक्षणासाठी कशी कार्यप्रवण होती या संदर्भातील इतिहास सविस्तर व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. पांडुरंग मिसाळ- मराठी विभाग प्रमुख यांनी जयंती व पुण्यतिथी कोणत्या व्यक्तीची केली जाते याचा ऐतिहासिक दाखला देऊन जे स्वतः काबाडकष्ट करून जीवन जगतात आणि दुसऱ्यांना जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवितात त्यांचीच पुण्यतिथी केली जाते असे मत व्यक्त करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा जसा वसा आणि वारसा चालविला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कै.स्व. विलासराव सावळेराम तांबे यांनी सुद्धा शिक्षणाचा तोच वसा आणि वारसा कसा चालविला या बाबत मत मांडून शालेय जीवनापासून ते गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची पायाभरणी करण्यापर्यंतचा त्यांचा इतिहास आणि संस्थेचे वटवृक्षात झालेले रूपांतर याचा सविस्तर लेखाजोखा मांडून विवेचन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे,खजिनदार- मा.श्री. मयुर मुरलीधर ढमाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी मा. श्री.राजीव पाटील -प्रशासकीय सल्लागार श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. हंसराज थोरात,प्राचार्य- शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय व रामचंद्र पाटील औटी ज्युनिअर कॉलेज, डॉ.प्रमोद इंगळे,प्राचार्य – ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, श्री.अतुल पानसरे, मुख्याध्यापक – राजा शिवछत्रपती विद्यालय, सौ. शितल पाटील,मुख्याध्यापिका – आदित्य इंटरनॅशनल स्कूल तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली .