शबनम न्यूज , प्रतीनिधी :
मावळ तालुक्यात अजित पवार यांचे कट्टर समर्थक असणारे 125 कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लोणावळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात कार्यकर्ते नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी विश्वासात घेतले जात नसल्याचे कारण सांगत सामूहिक राजीनामा दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू असताना हा अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काम करतो परंतु बदलत्या परिस्थितीत आपल्या शिस्तप्रिय नेतृत्वाकडून योग्य ती दखल न घेतल्याने लोणावळ्यातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत तसेच कामाची योग्य दखल घेतली जात नाही त्यामुळे आम्ही सामूहिक राजीनामा देत आहोत, ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पक्षीय पातळीवर दुय्यम स्थान दिले जात असल्याने नाराजीचे कारण सांगत राजीनामा देण्यात आला असल्याची सध्या मावळमध्ये चर्चा आहे.