शबनम न्युज | पुणे
डी.वाय.युनिव्हर्सिटी(आंबी,पुणे ) मध्ये दि.२६ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान इंटर्नशिप,प्लेसमेंट सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्यात २० हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत.संगणकशास्त्र,आय.टी.एमसीए, एमबीए,अभियांत्रिकी,हॉटेल मॅनेजमेंट,फार्मसी क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत.कुलगुरू डॉ.सायली गणकर यांच्या मार्गदर्शनखाली कर्नल सुनील भोसले,डॉ.प्रणव रंजन,डॉ.अनुप शिवनेचारी,डॉ.दास,प्रा.महेश खुडे,प्रा.हिमांशू अहिरे,प्रा.प्रवीण राठोड,प्रा.सोफिया मुजावर,विद्यार्थी प्रतिनिधी तसेच स्टुडंट कौन्सिलच्या प्रतिनिधीनी संयोजन केले.
या सप्ताहाच्या पूर्व तयारी करताना विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा,मॉक इंटरव्ह्यू,कौशल्य प्रशिक्षण,संभाषण कौशल्ये असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले.’विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि सर्वांगीण तयारी करण्यासाठी या सप्ताहाचा उपयोग होत आहे.डी.वाय.युनिव्हर्सिटीच्या टीम सोबत व्यावसायिक तज्ज्ञ आणि कंपन्या सहभागी झाल्या आहेत.त्यातून व्यावसायिक गुणवत्तेचे विद्यार्थी पुढे येतील आणि त्यांना चांगल्या संधी मिळतील.मेकॅनिकल इंजिनियरिंग,सेल्स अँड मार्केटिंग,डेटा सायन्स,डेटा अनॅलिटीक्स,कन्टेन्ट रायटिंग,संशोधन,डिजिटल मार्केटिंगमधील संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत’,असे कुलगुरू डॉ.सायली गणकर यांनी सांगितले.