शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील योगदान प्रतिष्ठान व ब प्रभाग सभापती व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 18 मधील आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीचे फराळाचे वाटप करण्यात आले.
मागील दीड वर्ष हे पूर्ण कोरोना मध्ये गेले अनेक दुःखद प्रसंगांना तोंड द्यावे लागले. मागील दिवाळी साजरी करण्यात आली नाही. परंतु कर्मचाऱ्यांची हे आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पडत होते. सफाई कर्मचाऱ्यांना सण उत्सवात प्रसंगी सुट्टी मिळत नाही. तरीही अशा प्रसंगी आनंदाच्या क्षणी आरोग्य व सफाई कामगार असो त्यांची आठवण आपण व समाज नेहमी लक्षात ठेवतो म्हणून आपण त्यांना फराळ आणि साडी ड्रेस देऊन त्यांना सन्मानित केले असल्याचे यावेळी नगरसेवक सुरेश भोईर यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र गावडे, रवींद्र देशपांडे, तुकाराम चौधरी, आबा गावडे, दत्तात्रय भोईर, गडदे काका, सुभाष पंडित, नकुल भोईर, हरिभाऊ मोहिते, शिवाजी राऊत व आदी मान्यवर उपस्थित होते.