शबनम न्युज / बीड
मानव विकास परिषदे च्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी ॲड. सय्यद अजीम यांची निवड करण्यात आली आहे.
मानव विकास परिषद म्हणजे शोषित,श्रमिक, पोलीस कोठडीत मृत्यू, बेकायदेशीर अटक, अत्याचार , शोषण , गुलामगिरी, दहशत., मागास वर्गीय वर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक मानवी हक्काचे उल्लंघन शासकीय अधिकाराचा गैरवापर भांडवल शाही कडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समुळनाश करण्यासाठी तसेच सर्वसामान्याचे संविधानिक मान या हक्कासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देणारा बुलंद आवाज . सामाजिक बांधिलकी निस्वार्थ वृत्ती आणि प्रमानिकपणा यामुळे मानव विकास परिषद जनतेकडून प्रचंड समर्थन मिळत आहे या महाकार्या करिता ॲड.सय्यद अजीम यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.