शबनम न्युज / शिरूर
शिरूर-हवेलीचे आमदार अॅड् अशोक पवार आणि माजी सभापती सुजाता पवार यांच्या लग्नाच्या वाढदिवस निमित्ताने आज पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा. श्री पंडित आप्पा दरेकर यांच्या वतीने मतदार संघातील पाचही प्रतिभा आरोग्य मंदिर मांडवगण फराटा, उरळगाव, तळेगाव ढमढेरे, वाजेवाडी चौफुला, कोरेगाव मुळ तसेच कदमवाकवस्ती, वाघोली बीजेएस कॉलेज, सी.टी. बोरा कॉलेज शिरूर, कारेगाव, मलठण, पाबळ, शिरूर ग्रामीण रुग्णालय, न्हावरे ग्रामीण रुग्णालय, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व टाकळी हाजी इत्यादी कोविड सेंटर येथे कोरोना रुग्णांसाठी मासवडी आणि लापशीचे जेवण देण्यात आले.
आमदार अॅड् अशोक पवार आणि माजी सभापती सुजाता पवार मतदारसंघातील कोविड रुग्णांसाठी रात्रंदिवस कार्यरत असतात, या सेवेच्या या महायज्ञात फुल ना फुलाची पाकळी म्हणून लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंडित आप्पा दरेकर यांनी कोविड सेंटर मधील सर्व रुग्णांना मासवडी आणि लापशीच्या जेवणाचे नियोजन केले.
यावेळी आमदार अशोक पवार, माजी सभापती सुजाता अशोक पवार, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर, खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, दानशूर व्यक्तिमत्व संभाजी आप्पा फराटे, माजी संचालक दत्तात्रय फराटे, धनुभाऊ फराटे आदी मान्यवर उपस्थित होते.