शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिके ची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्येच होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे काही दिवसापासून कोरोना मुळे महापालिकेची निवडणूक ही सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या चर्चा होत होत्या पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार मतदार यादी अद्यावतीकरण करणे कार्यक्रम घोषित केला असल्याने आता ही निवडणूक येत्या फेब्रुवारीमध्ये नियमित वेळेत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राजकारण आता तापायला लागले आहेत सत्ताधारी भाजप चा कारभार आता चव्हाट्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपटले आहे त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करणारे फ्लेक्स पिंपरी चिंचवड शहरात लावले आहेत
“नको आता त्यांचा सल्ला, मजबूत करू राष्ट्रवादीचा किल्ला” असे म्हणत येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता परत आणण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांनी हे फ्लेक्स वार सुरू केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये लावलेल्या या फ्लेक्स मध्ये भाजपवर टीका करणारे स्लोगन वापरण्यात आले आहे त्यामध्ये विलास लांडे यांनी असे म्हटले आहे की
“कोविड सेंटर मधून नागरिकांच्या पैशांवर हल्ला, हिशेबात घोळ म्हणून सत्ताधाऱ्यांचा एकमेकांवर शाब्दिक हल्ला”
या आशयाचे फ्लेक्स माजी आमदार विलास लांडे यांनी शहरात लावल्याने आता राष्ट्रवादी सत्ताधारी भाजपला येणाऱ्या निवडणुकीत मात देऊन परत महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिके ची भाजपची सत्ता एक हाती आहे भाजप कडून सत्ता परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादी वतीने माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपटले असून महानगरपालिकेतील भाजप चा चुकीचा कारभार पिंपरी-चिंचवड करांच्या समोर फ्लेक्स वॉर द्वारे आणणार हे निश्चित