शबनम न्युज / पुणे
पुणे विभागातील 16 लाख 41 हजार 115 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 लाख 21 हजार 918 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 44 हजार 925 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 35 हजार 878 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.31 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 53 हजार 595 रुग्णांपैकी 10 लाख 25 हजार 367 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 372 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.32 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 95 हजार 94 रुग्णांपैकी 1 लाख 81 हजार 540 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 856 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 64 हजार 275 रुग्णांपैकी 1 लाख 57 हजार 881 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 988 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 406 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 47 हजार 787 रुग्णांपैकी 1 लाख 33 हजार 976 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 703 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 61 हजार 167 रुग्णांपैकी 1 लाख 42 हजार 351 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 6 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 810 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 99 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 282, सातारा जिल्ह्यात 803, सोलापूर जिल्ह्यात 253, सांगली जिल्ह्यात 937 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 824 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 975 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 246, सातारा जिल्हयामध्ये 811, सोलापूर जिल्हयामध्ये 353, सांगली जिल्हयामध्ये 849 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 716 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 40 लाख 95 हजार 821, सातारा जिल्ह्यामध्ये 8 लाख 95 हजार 846, सोलापूर जिल्हयामध्ये 7 लाख 34 हजार 148, सांगली जिल्हयामध्ये 8 लाख 70 हजार 573 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 84 हजार 102 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 7 लाख 97 हजार 873 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 17 लाख 21 हजार 918 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.