शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला असून मोठी खळबळ उडाली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक कक्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असून तपासणी सुरू आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षामध्ये लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे. एका कंत्राटदाराकडून दोन लाख रुपयाची लाच स्वीकारली म्हणून स्थायी समितीच्या लिपिक आणि शिपाई यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार होत असल्याच्या बातम्या वारंवार छापून येतात. त्याच्या आधारावर लाचलुचपत विभागाने आज दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू झाल्यानंतर छापा टाकला.
महापालिकेत ‘एसीबी’चा छापा; स्थायी समिती अध्यक्षांसह चौघांना घेतले ताब्यात
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर आज (बुधवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापा टाकला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.