शबनम न्यूज या वृत्तपत्राचे सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांचे मनापासून शतशः आभार. आपल्या सहकार्याने आम्ही हे पाचवे वर्धापन दिन साजरे करीत आहोत. 15 ऑगस्ट 2016 रोजी शबनम न्युज या साप्ताहिक वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला फक्त हे साप्ताहिक वृत्तपत्र प्रसिद्ध करत होतो. बदलत्या काळानुसार आधुनिक व डिजिटल विश्वात शबनम न्यूज वेबसाईट सुरु करण्यात आली व त्या द्वारे बातमी देण्याचे कार्य सुरू झाले. ते आजतागायत सुरू आहे. शबनम न्यूज वृत्तपत्राने हे पाच वर्ष हितचिंतक, जाहिरातदार व वाचक वर्गाच्या प्रचंड प्रतिसादामुळे पूर्ण केले आहे.
या पाच वर्षात शबनम न्यूज वतीने सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचे कार्य केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, क्राईम असे अनेक क्षेत्रात शबनम न्यूज बातमी देण्याचे कार्य करीत आहे. व सतत करत राहणार.
गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात शबनम न्युज साप्ताहिक वृत्तपत्राने ऑनलाईन न्यूज पोर्टल द्वारे दररोज वाचकांसाठी ताज्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या, मनोरंजन, लाइफस्टाइल, खाऊअड्डा, फेरफटका,अवांतर, वास्तुविशेष, नोकरी, इ-पेपर असे विविध सदर सादर केल्या आहेत. शबनम न्यूज या मराठी न्यूज पोर्टल द्वारे वाचक व सर्वच प्रेक्षक आपल्या मोबाईलवर एका क्लिकवर शबनम न्यूज वरील बातम्या कधीही कोठेही मिळूवू शकतात व या डिजिटल विश्वात, ऑनलाईन विश्वात शबनम न्यूज ने हे यश मिळविले आहे. व शबनम न्यूज वरील बातमी वाचकांना दररोज कोणत्याही क्षणी आपल्या मोबाईलवर shabnamnews.in या वेबसाईटवर मिळत असतात. व या वेबसाइटला ही वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला व मिळत आहे.
शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या वतीने कोरोना काळातही बातम्यांस वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अविरतपणे करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पुणे शहरात इतर राज्यांपेक्षा इतर जिल्ह्यापेक्षा जास्त रुग्ण संख्या आढळत होती. शासन वतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. अशा संकटमय व बिकट परिस्थितीतही शबनम न्यूज वतीने बातमी देण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवले. त्यात खंड पडू दिला नाही.
कोरोना रुग्णांची दररोजची संख्या तसेच नवीन रुग्णांचे आकडे व बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तसेच या कोरोना काळात मयत झालेल्या रुग्णांची संख्या वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या काळात शबनम न्युज वतीने करण्यात आले.
शबनम न्यूजच्या कार्याला जाहिरातदारांनी सहकार्य केले. व या जाहिरातदार, वाचक वर्गाच्या जोरावर आज शबनम न्यूज पाच वर्षे पूर्ण करत आहे. व सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे
शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने शबनम न्यूज मराठी वृत्तपत्र तसेच वेब न्यूज चैनल व मराठी न्यूज पोर्टल मार्फत कार्य सुरू आहे. तसेच हिंदी भाषिक वाचकांसाठी शबनम न्युज मीडिया ग्रुप वतीने शबनम समाचार हे हिंदी भाषेत न्यूज पोर्टल चालविले जाते.
पुणे व पिंपरी-चिंचवड हे मोठे महानगर आता स्मार्ट सिटी कडे वाटचाल करीत आहेत. या शहराच्या वाटचाली सोबतच शबनम न्युज ही आधुनिक पद्धतीने बातम्या देण्याचे कार्य करीत आहे. ही वृत्तसेवा देताना शबनम न्यूज पाच वर्ष पूर्ण करीत असताना सहाव्या वर्षात पदार्पण करताना एक उंच भरारी घेत आहे. ती म्हणजे आता शबनम न्यूज मिडीया ग्रूप वतीने पत्रकारिता क्षेत्रात दैनिक सुरू करीत आहे. लवकरच या दैनिक वृत्तपत्राचे प्रकाशन होणार आहे. आपणास सांगताना आनंद होत आहे कि, शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने दैनिक वृत्तपत्र लवकरच वाचकांच्या सेवेत प्रकाशित करीत आहोत. जसे आपण मागील पाच वर्षापासून शबनम न्यूज या वृत्तपत्राला, न्यूज पोर्टल यांना भरभरून सहयोग व सहकार्य केले तसेच येणाऱ्या दैनिक वृत्तपत्राला ही आपले सहकार्य व सहयोग मिळेल अशी अपेक्षा.